वर्धा जिल्हा प्रतिनिधी मंगला भोगे
पोलीस स्टेशन आर्वी येथील डि.बी. पथकाने दि 23/10/2023 रोजी पो.स्टे. पाचोड जंगल शिवार येथे वाॅशआउट मोहिम राबवित मोहा दारूची निर्मीती करणारे आरोपी नामे- दिलीप चव्हाण रा. पाचोड ता. आर्वी यास पोलीस आल्याची चाहूल लागताच मोक्यावरून पसार झाला..
घटनास्थळाची पंचा समक्ष पाहणी केली 5 लोखंडी ड्रम मध्ये एकुण 1000 लिटर मोहा सडवा रसायण, 05 लोखंडी ड्रम असा एकुण जु.किं. 102500/- रू. चा मुद्देमाल मोक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून, जप्त मालापैकी सिलबंद सि.ए. सॅम्पल तयार करून उर्वरित संपुर्ण मुद्देमाल पंचासमक्ष जागीचं नाष करून पो.स्टे. परतीनंतर आरोपीविरूध्द पो.स्टे. आर्वी येथे अप क्र. 1185/2023 कलम 65 (एफ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन , अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन आर्वी पोलीस निरीक्षक प्रशांत काळे सा. यांचे निर्देशाप्रमाणे पो.अं. सचिन धुर्वे, अंकुश निचट, राधेश्याम टेंबरे, किरण कुरटकर, अतुल गोटेफोडे यांनी केली.