मयुर खापरे चादुंर बाजार
चांदूरबाजार येथील गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे युवा महोत्सवाच्या विविध कला स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा युवामहोत्सव अमरावती येथील प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा येथे आयोजित करण्यात आला. या महोत्सवामध्ये महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान विभागातून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. कु. मधूरा मोहोड, कु. कुमकुम लिवकर,माधुरी सुर्जसे, सानिका डाहाने, श्रुतिका वांगे, रितेश ठाकरे, तन्वी अढाऊ, सार्थक राऊत, सेजल मोखळकर, आफ्रीन सदाफ, पौर्णिमा नवलकर, सिद्धांति भोकसे, स्नेहल माळवे, दानिया सरोश या व इतर विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धा,स्पाॅट पेंटिंग, कार्टूनिंग, समूह गान, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा व गीत गायन अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळण्याचे व्यासपीठ म्हणजे युवा महोत्सव असे प्रतिपादन
प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष मा. भास्करदादा टोम्पे तसेच सचिव डॉ.विजय टोम्पे यांनी अभ्यासासोबत विद्यार्थ्याचा युवामहोत्सव मधला सहभाग तेवढाच आवश्यक असल्याचे सांगितले. युवा महोत्सवाचे मुख्य समन्वयक प्रा. प्रशांत यावले व त्यांच्या समवेत प्रा. उमेश कनेरकर, प्रा. प्रिया देवळे, प्रा. युगंधरा गुल्हाने यांनी परिश्रम घेतले.