(नवत्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष)
जिल्हा प्रतिनिधी,श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव तालुक्यातील कासारबेहळ गावाला ऐतिहासिक वारसा लाभला असुन या ठिकाणी प्राचीनकाळी कासार समाजाचे वास्तव्य होते. व ते याठिकाणी बांगड्या बनवुन परीसरातील गावात विकत असत अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
नवसाला पावणारी माता म्हणुन ख्याती असलेली वाघाई मातेच्या दर्शनाला भाविकांची गर्दी उसळली असुन या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी गावकऱ्यांच्या वतीने पिण्याचे पाणी व ईतर सोयी सुविधा पुरविल्या जातात परंतु लोकप्रतिनिधींचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याची खंत गावकरी व्यक्त करीत आहेत.
वाघाई मातेची मुर्ती ही स्वयंभु असुन अंदाजे चारशे ते साडेचारशे वर्षांपूर्वी प्रकट झाली असावी. वाघाई माता नवसाला पावणारी असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात याठिकाणी नवरात्रोत्सवाप्रमाणेच माघी पौर्णिमेला आपला नवस फेडण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते मातेचे मंदिर हे पुर्वाभिमुख असुन नाल्याच्या काठावर वसलेले आहे. समोर पैनगंगा नदी वाहते. मंदिराच्या भोवताली दाट झाडी असल्याने येथील वातावरण नेहमी प्रसन्न व मनोहारी आहे. मातेच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली तसेच मातेचे उपलब्ध करून दिली तसेच मातेचे प्राचीन मंदिर मोडकळीस आल्याने गावकऱ्यांनी लोक वर्गणीतुन मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले असुन मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता व्हावी भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तत्कालीन पंचायत समिती सदस्य मोहनराव कर्हे यांच्या प्रयत्नातून सण २००० साली रस्त्याच्या खडीकरणाचे काम करण्यात आले त्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या मंदिराला एक रुपयाची निधी दिला नसल्याची खंत गावकर यांनी व्यक्त केली आहे.
पुर संरक्षक भिंत देण्याची गरज
मातेचे मंदिर ओढ्याच्या (नाल्याच्या काठावर वसलेले असल्याने नाल्याच्या पुराच्या पाण्याचा धोका मंदिराला कायम असल्याने मंदिराला पुर संरक्षक भिंतीची गरज असुन या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवुन मातेच्या मंदिराला पुर संरक्षक भिंत बांधन देण्यासाठी प्रयत्न करावे.