चोहोटा बाजार :- अमोल राणे
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व गावांमध्ये व चोहोटा बाजार, रेल येथे आज रोजी दि.18/10/2023 ठीक 11.00वा.मा.ठाणेदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गामाता व शारदा देवीची पारंपारिक मिरवणूक मार्गाची पाहणी व रूट मार्च काढण्यात आला,
त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये मंडळाची सभा व शांतता समिती सभा घेण्यात आली सभेमध्ये सविस्तर सूचना देण्यात आल्या
,त्यानंतर चोहोटा बाजार, येथे मिरवणुक मार्गाची पाहाणी,व रूट मार्च काढण्यात आला .त्यानंतर दहीहंडा येथे रूट मार्च घेण्यात आला. रूट मार्च मध्ये २ अधिकारी १५ अंमलदार ३३ होमगार्ड ,महावितरण चे वायरमन,पोलीस पाटील, सरपंच, गावातील शांतता समितीचे सदस्य, इत्यादी सह हजर होते.