मराठी वाड्.मय मंडळाचे उद्घाटन व गझलयात्री गझल मुशायराचे आयोजन
प्रतिनिधी :- अमोल राणे
अकोला : येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला. त्यामध्ये मराठी वाड्.मय मंडळाचे उद्घाटन, काव्यवाचन आणि गझलयात्री गझल मुशायराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट तर प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रंथपाल व आक्यूएसी समन्वयक डॉ.आशिष राउत, डॉ.नाना वानखडे मानव्यविद्या शाखा प्रमुख, डॉ.सुलभा खर्चे, मराठी विभाग प्रमुख हे उपस्थित होते. तर गझलयात्री या कार्यक्रमामध्ये सहभागी गझलकार म्हणून संदीप वाकोडे, गोपाल मापारी, अमोल शिरसाट, प्रवीण हटकर, वैभव भिवरकर, निलेश कवडे,विशाल नंदागवळी आणि अमोल गोंडचवर हे होते.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमाचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुलभा खर्चे यांनी केले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ.अंबादास कुलट यांनी केले आणि गझल मुशायऱ्यासाठी महाविद्यालयात आलेल्या नामवंत गझलकारांचे स्वागत केले. आणि वाचन – लेखनातूनच माणूस मोठा होतो. असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी वाड्.मय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत मान्यवरांनी पुष्प देवून केले. गझलमुशायऱ्याचे बहारदार संचालन अमोल गोंडचवर यांनी केले. तेव्हा प्रत्येक गझलकारांनी सामाजिक, राजकीय, प्रेमविषयक गझलांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये अमोल शिरसाट यांच्या ‘विषय संपला’ आणि गोपाल मापारी, संदीप वाकोडे, गोंडचवर आदिंच्या गझलांनी उपस्थितांची मने जिंकली. तेव्हा उपस्थितांमध्ये अकोल्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील जेष्ठ नाट्यकर्मी मधू जाधव व रमेश थोरात व मिसेस थोरात उपस्थित होते. त्याचप्रमाणे डॉ.चेतन राउत, डॉ.दिपक वानखडे, डॉ. संजय पोहरे, डॉ. श्रध्दा थोरात, डॉ. कपिला म्हैसने, डॉ.रावसाहेब काळे, डॉ.प्रवीन वाघमारे,डॉ.साधना कुलट,प्रा.मिलिंद तायडे, प्रा.सोनोने आदि शिक्षक व बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गणेश मेनकार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.आरती इंगळे यांनी मानले. वाड्.मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.