ग्रामपंचायत सरपंच सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण चोहट्टा बाजार येथे संपन्न

 



तीन दिवस लाभले प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातुन गावामध्ये शास्वत विकास साधावा..प्रशिक्षक सुधीर सरकटे


 प्रतिनिधी :- अमोल राणे 

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांचे प्रशिक्षण यशदा पुणे जिल्हा परिषद अकोला व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अकोट तालुक्यातील ग्राम सचिवालय चोहट्टा बाजार येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्या शितल मेटकर, निर्देशक नागसेन बागडे, गटविकास डि एन रूद्रकार साहेब, विस्तार अधिकारी मदनसिंग बहुरे साहेब नागे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली सत्र समन्वयक सुधीर सरकटे यशदा प्रशिक्षक रोहीदास भोयर, गणेश पोटे, प्रतिभा काटे यांनी गावाचा पर्यायाने ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळतांना उपयुक्त ठरणारी माहिती क्षमता बांधणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येत असताना कार्यात गतिमानता येण्याकरिता सरपंच उपसरपंच सदस्यांचे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय तसेच वैयक्तिक स्तरावरील योगदान असण्याकरिता ग्राम सचिवालय चोहट्टा बाजार येथे दि. 16 ऑक्टोंबर ते 18 ऑक्टोंबर 2023 येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या उद्धाटना करीता चोहट्टा बाजार सरपंच सुभाष मुकुंदे, ग्रा.पं नखेगाव सरपंच दिनेश वाघमारे, करतवाडी रेल्वे प्रभारी सरपंच रमाबाई रामहरी पेठे टाकळी खुर्द,उपसरपंच मिना गवळी, उपसरपंच मंगला वाघमारे, टाकळी बुद्रुक सरपंच निळकंठ पाटील वसु,प्रशिक्षक सुधीर सरकटे, इतर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, उपसरपंच उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये ग्रामपंचायत चे कामकाज मासिक सभा, ग्रामसभा महिला सभा व सभेच्या वेळेचे व्यवस्थापन, शास्वत विकासाचे उद्वीष्टे, सरपंच सदस्य पदाचे अधिकार ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 व सामाजिक लेखापरीक्षण व्यक्तिमत्व विकास, लोकसहभागातून ग्रामविकास, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ठळक तरतुदी, सरपंच उपसरपंच सदस्य पदाचे अधिकार कर्तव्य व जबाबदारी, जलसाक्षरता, पाण्याचे ताळेबंद, घनकचरा व्यवस्थापन, नेतृत्व गुण, गाव विकासाची दृष्टी, आमचा गाव आमचा विकास, 15 वित्त आयोग, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, गाव विकास विविध समित्या, खरेदी प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे बाबी, अंदाज पत्रक, 1 ते 33 नमुने, मानव विकास निर्देशांक, आदर्श गाव संकल्पना चित्रफित दाखवून यावर चर्चा करण्यात आली असून इत्यादी विषयाची सविस्तर अशी माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली या प्रशिक्षणामध्ये रेल, धारेल, नखेगाव, टाकळी खु, टाकळी बु, करतवाडी रेल्वे, तरोडा, मरोडा, पाटसुल, रौदळा इत्यादी ग्रामपंचायत सदस्य या प्रशिक्षणाला उपस्थित होते या प्रशिक्षणाचा समारोप दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी करण्यात आला असून प्रशिक्षणार्थींना उपयुक्त असलेली माहिती पुस्तिका व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला संचालन सुधीर सरकटे यांनी केले असून आभार गणेश पोटे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post