महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेच्या पाठपुराव्याला यश

 



मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

एस.टी तिथे लॉटरी स्टॉल! महाराष्ट्रातील प्रत्येक एस.टी आगारात शासनाच्या लॉटरीसाठी स्टॉल मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला होता. त्याला मंजुरी मिळाली असून यापुढे एस.टी तिथे लॉटरी स्टॉल ग्राहकांना दिसणार आहेत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकानी नुकताच एक आदेश जारी केला त्यात विक्रेता संघटनेच्या मागणीला हिरवा कंदील दिला आहे. ही बाब महाराष्ट्रातील ग्राहक विक्रेते आणि सरकारच्या हिताचे रक्षण करणारी असल्याचे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लॉटरी विक्रेत्यांचे तडफदार नेते  विलास कृ सातार्डेकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व एस.टी विभागाच्या नियंत्रकांना लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत. लॉटरीच्या तिकीटांची विक्री वाढविण्यासाठी एस.टी बस स्थानकावर शासकीय लॉटरी तिकिट विक्री केंद्राला परवानगी मिळाली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी जातीने लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि एस.टी.चे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांचे जाहीर आभार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

ग्राहकांना आकर्षक बक्षिसे, विक्रेत्यांना कमिशन मधून रोजीरोटी, तसेच सरकारला विक्रीतून महसूल तसेच एस.टी ला शासकीय योजना राबविण्याचे समाधान मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विक्रमी विक्री होण्यासाठी हे स्टॉल सहाय्यभूत ठरणार असल्याचे सातार्डेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील एस.टी बस स्थानकांवर तिकीट विक्री केंद्रासाठी जे विक्रेते उत्सुक असतील त्यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे पदाधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधावा जेणेकरून विक्रेत्यांना अधिक मार्गदर्शन त्यातुन होऊ शकेल.

 

Post a Comment

Previous Post Next Post