चांदूरबाजार येथील गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली असून त्यांच्या पुस्तकांचा विषय हा मुख्यतः भारतीय तरुण होता. वाचनाने माणूस घडत असतो. पुस्तक हे माणसाच्या जीवनात मित्र म्हणून वागत असतात तेव्हा आपण चांगल्या पुस्तकाच्या सानिध्यात असले पाहिजे, चांगली पुस्तकं वाचन केली पाहिजे. पुस्तक वाचण्याने माणूस सुसंस्कृत होतो असे म्हणाले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण परिमल, डॉ. युगंधरा गुल्हाने, ग्रंथपाल डॉ. पार्वती शिर्के, डॉ. नंदकिशोर गव्हाळे, डॉ. लालबा दुमटकर, प्रा. मंजुषा पवार, कर्मचारी विजय कोथळकर, शिल्पा उल्हे आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे पुस्तकांचे वाचनही केले.