खापरवाड्याच्या शेतकऱ्यांना लावला लाखोचा चुना ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

 




मूर्तिजापूर - तालुक्यातील खापरवाड्याच्या काही शेतकऱ्यांना तेथीलच एका महाठकाने शेतमाल घेऊन पैसे न दिल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता त्याच्या विरोधात खापरवाडा येथील शेतकऱ्यांनी दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी माना पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

           तालुक्यातील खापरवाड्याचे पंडित गोविंद गवई वय ५० वर्ष, अमोल रामदास गवई वय ४२, गौतम वकील गवई वय ५९ वर्ष, चंद्रकला साहेबराव गवई वय ६६ वर्ष, बेबीबाई प्रल्हाद वानखडे वय ७० वर्ष, व बाळकृष्ण वासुदेव कुकडे वय ४० वर्ष सर्व राहणार खापरवाडा येथील शेतकऱ्यांनी येथीलच राहणारा महाठक अण्णा सागर सुधाकर कीर्दक वय २७ वर्ष राहणार खापरवाडा, याने शेतकऱ्यांचा कापूस व सोयाबीन तूर व हरभरा खरेदी करून त्यांना पैसे न दिल्याने व चेक देऊन तो चेक त्यांच्या खात्यात पैसे नसल्याने तो चेक बँकेतून परत आला. त्यानुसार या महाठकावर विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी खापरवाडा येथील शेतकऱ्यांनी केली.महाठक अण्णा सागर सुधाकर कीर्दक या इसमाने तक्रारदाराकडून सोयाबीन, कापूस, तुर व हरभरा इत्यादी शेतमाल खरेदी करून त्यांना नगद रुपये दिले नाहीत. त्यांना त्यांच्या पैशाचा मोबदला म्हणून बँकेचे चेक दिले. ते शेतकरी बँकेत गेले असता. या चेकच्या खातेदाराच्या बॅक खात्यात पैसे नसून त्यांनी दिलेले हे चेक बाउन्स होऊन शेतकऱ्यांना परत मिळाले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे महाठक अण्णासागर सुधाकर किर्दक यांनी फसवणूक केली असून त्यांच्यावर फसवणुकीचा व चेक बाउन्स होण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------

सदर तक्रारीची चौकशी पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून ही तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे पाठवणार.

सुरज सुरोशे

ठाणेदार 

पोलीस स्टेशन माना

Post a Comment

Previous Post Next Post