संघटनेचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष कैलास महाजन यांची मध्यस्थी ठरली यशस्वी ; ग्रामस्थानी उपोषण सोडले
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - येथील पुरवठा अधिकारी चैताली यादव यांच्या गैरवर्तन व राशन कार्डच्या समस्या बाबत तालुक्यातील विरवाडा गावातील ग्रामस्थांनी उपोषणाचा पवित्रा हाती घेतला होता, या बाबतीत स्थानिक माध्यमांनी वृत्त प्रसारित करताच जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले असून आज जिल्हा पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देत संपूर्ण प्रकार जाणून घेतला. आणि पुरवठा अधिकारी चैताली यादव दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी उपोषणकर्त्यांना ग्वाही दिली. या आश्वासना नंतर उपोषण कर्त्यांनी आपले उपोषण ६ व्या दिवशी मागे घेतले. यासाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष कैलास महाजन यांनी मध्यस्थी करून दिली.
मूर्तिजापूर पुरवठा विभागा मार्फत विरवाडा या गावातील अंतोदय कार्ड धारकांची संख्या ३४ असून मूर्तिजापूर पुरवठा विभाग मार्फत ६१ बनविण्यात आले, सदर जास्त कार्ड कोणा साठी व कशा साठी बनविले, ज्यांचे घरची परिस्थिती चांगली आहे त्यांना अंतोदयाचे कार्ड कोणत्या नियमाने देण्यात आले, गावातील भूमिहीन तसेच गोरगरीब दिव्यांग बांधवांना अद्याप राशन कार्ड का देण्यात आले नाही, ह्या प्रमुख मागण्या सदर गावकऱ्यांनी रेठुन धरल्या होत्या, जिल्हा पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या वृत्ताची दखल घेत या बाबतीत आंदोलन स्थळी भेट देत येणाऱ्या एक महिन्यात आत या प्रकारणात दोषी असलेल्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी काळे , भावना दताळे,स्वस्त धान्य दुकानदार संघटना कार्यकारि जिल्हाध्यक्ष कैलास महाजन,दादाराव जामनिक,देवानंद वानखडे ,संजय पखाले ,विक्की गवई,योगेश आसटकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.