यावर्षीचा दसरा-दिवाळी सण शेतकऱ्यांचा अंधारातच जाणार चोहोट्टा बाजार,
प्रतिनिधी -अमोल राणे
टाकळी बु परिसरात सोयाबीन पिकाचे उत्पादन अत्यल्प झाले. शिवाय सोयाबीनला पाहिजे तसा भावही मिळाला नाही. त्यामुळे यावर्षीचा शेतकऱ्यांचा दसरा-दिवाळी सण अंधारात जाणार असल्याचे चिन्ह दिसायला लागले आहे.
यावर्षी पाऊस उशीरा सुरु झाला. मध्यंतरीच्या काळात निसर्गाच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे खरीप हंगामातील हलक्या वाणाच्या मुंग सोयाबीनचेही उत्पादन घटले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढले. परंतू उत्पादन घटल्याने व बाजारपेठेत भावही मिळत नसल्याने यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर आर्थिक संकटता घोंघावत आहे. अल्पभाव मिळत असल्याने पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावीत आहे. शिवाय काही शेतकऱ्यांनी सावकाराकडून मोठ्या व्याजाचे कर्ज काढले. काहींनी सोन्या-चांदीचे दागिणे गहाण केले. तर काहींनी उसने- उधार पैसे मागून खरीप हंगामात सोयाबीनची लागवड केली. परंतू उत्पादन घटल्याने व भावही बाजारपेठेत कमी मिळत असल्याने अनेकांचे उत्पादन खर्चच निघाले नाही. शिवाय दसरा-दिवाळी सण पुढे येऊन ठेपला आहे. त्यामुळे आर्थिक टंचाई शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली आहे...
प्रतिक्रिया - अनंत नागोराव वसु टाकळी,बुद्रुक,शेतकरी
मि तिन एकर शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उदपादन घटले त्यामुळे केलेला खर्च सुद्धा निघालेला नाही त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.