वाढत्या चोरीच्या प्रमाणावर अंकुश लावणे दत्तापूर पोलिसांपुढे आवाहन !
धामणगाव शहरातील मध्यवस्ती मध्ये असणाऱ्या बालाजी स्टोन क्रेशर ऑफिस समोरील दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ५ ऑक्टो. रोजी रात्री ९ ते १० च्या सुमारास घडली. आणि शहरातील चोरीच्या प्रमाणात आणखी एक वाढ झाली. त्यामुळे दत्तापूर पोलिसांपुढे वाढत्या चोरीवर अंकुश लावण्याचे आवाहन उभे ठाकले आहे.
प्रमोद किसन हेंडवे, रा.वाघोली असे दुचाकी मालकाचे नाव, ३ वर्षा अगोदरच त्यांनी एम एच २९ ए.जी.१८६९ हिरो स्प्लेंडर दुचाकी विकत घेतली होती. ते व्यवसायाने टेलर असून धामणगाव येथील प्रिन्स टेलर या दुकानात अनेक वर्षांपासून काम करीत आहे. नेहमीप्रमाणे वाघोलीवरून धामणगावला ते आपल्या दुचाकीने काम करण्याकरिता दुकानात आले आणि आपली दुचाकी नेहमीच्या ठिकाणी पार्क केली. मात्र रात्री १० च्या सुमारास घरी परत जात असताना जेव्हा ते आपल्या दुचाकीकडे गेले तेव्हा त्यांना ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी बराचवेळ दुचाकीचा शोध घेतला पण त्यांना दुचाकी मिळून नाही.
त्यामुळे प्रमोद किसन हेंडवे यांच्या फिर्यादीवरून दत्तापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासात घेतला आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी सागर कदम करीत आहे.