नवरात्र उत्सवानिमित्त धामना बु येथे दर्शनासाठी भक्तांची वाढली गर्दी
प्रतिनिधी :- अमोल राणे
अकोट : तालुक्यातील ग्राम धामना बु येथे जाणामाता चे मंदिर आहे जे देवी भक्तांसाठी श्रद्धा आणि भक्तीचे स्थान बनलेले आहे इथे दरवर्षी नव रात्री उत्सव साठी भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी जमते, छोटे खेडेगाव त्यामुळे काही मोजके भक्त या दर्शनासाठी येत होते मात्र आता चोहोटा टे करतवाडी रेल्वे येतून सुलभ रस्ता उपलब्ध झाल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढत आहे सदर जाणामातेचे मंदिर चोहोटा बाजार येतुन 2 किलोमीटर अंतरावर आहे, या गावामध्ये टेकडीवर शिव मंदिर आहे पायथ्याशी खूप मोठे तलाव आहे.
या मंदिरा संदर्भात असे सांगितले जाते की आहे की आढे परिवार चे वंशज दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त दनोद मातेच्या दर्शनाला वारी करायचे मात्र वृद्धापकाळ आल्यामुळे दनोद जाणे शक्य झाले नाही त्यामुळे आढे परिवार मनातल्या मनात दुःखी झाला होता यामुळे दनोद च्या मातेने आढे परिवाराच्या वंशज यांना स्वप्नात दृष्टांत देऊन ग्राम धामना बु आपले मंदिर असल्याचा दृष्टांत देऊन तेथेच नवरात्र उत्सव साजरा करून दर्शन घ्यावे असा दृष्टांत दिल्यावरून देवीचे भक्त निताताई दीपक आढे यांनी सदर मंदिराचा जीर्णोद्धार केला व करत आहेत,तसेच जाणामातेच्या मंदिराला लागूनच त्याचे घर आहे,अखंड भजनाचा गजर होत असते जाणामातेच्या दर्शनासाठी दूर दूरवरून भक्त दर्शनासाठी येतात सदर मंदिराला तीर्थस्थळ घोषित करण्याची मागणी होत आहे,नवरात्र उत्सवानिमित्त या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आलेली आहे त्यामुळे फार दूर दूरवरून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करून दर दिवशी होम हवन आरती केली जात आहे मंदिराचे विश्वस्त आणि सहयोगी मंडळ नवरात्रीच्या पावन पर्वावर देवीचा उत्साह साजरा करतात त्यामुळे आसपासच्या गावातुन भक्त धामना गावात जाणामाता मंदिर येते दर्शन वारी करीत असतात.