इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच ताल ठोकायला सुरुवात
श्रीकांत राऊत/यवतमाळ: विधानसभा निवडणुकांना अजून बराच अवधी शिल्लक असला तरीही सन 2009 पासून आरक्षित असलेल्या उमरखेड विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच ताल ठोकायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे यात प्रत्येक राजकीय पक्षाकडे अर्धा- अर्धा डझनाच्या वर इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी दावा ठोकत असल्याचे दिसत आहे आरक्षित असलेल्या या विधानसभा मतदार संघात मतदार संघ आरक्षित झाल्यापासून म्हणजेच सन 2009 साली सर्वप्रथम काँग्रेस पक्षाकडून विजयराव खडसे यांचा विजय झाला होता त्यानंतर मात्र सन 2014 व 2019 अशी सलग दोन टर्म या विधानसभा मतदार संघावर भाजपाची पकड राहिली असून यामध्ये माजी आमदार राजेंद्र नजरधने व त्यानंतर उमरखेड नगरपालिकेचे तात्कालीन नगराध्यक्ष राहिलेले विद्यमान आमदार नामदेवराव ससाने यांच्या रूपाने या मतदारसंघातून भाजपाला सलग दोन वेळेस नेतृत्व करण्याची संधी मिळाली असल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे इच्छुक उमेदवारांचा सर्वाधिक लोंढा असल्याचे दिसत असून या इच्छुकामध्ये विद्यमान आमदार नामदेवराव ससाने माजी आमदार राजेंद्र नजरधने भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष विश्वपाल धुळधुळे भाविक भगत किसनराव वानखेडे सायली ताई शिंदे यांच्यासह अनेक जण भारतीय जनता पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याच्या अविर्भावात वावरत असल्याचे मजेदार चित्र दिसत असले तरीही भाजपाकडून ऐनवेळी निवडणूक काळात मतदार संघात सक्रिय झालेल्यांना किंवा इतर पक्षातून उपरे आलेल्यांना पक्षश्रेष्ठी कदापिही उमेदवारी देत नाही असा दावा राजकीय जाणकाराकडून केल्या जात आहे त्यामुळे मागील कित्येक काळापासून भाजपासोबत एकनिष्ठ राहणाऱ्या माजी आमदार राजेंद्र नजरधने विद्यमान आमदार नामदेवराव ससाने भाजपाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष विश्वपाल धुळ धुळे यांच्यापैकी एका नावावर भाजपाकडून मोहर लागण्याची शक्यता राजकीय जाणकाराकडून व्यक्त केल्या जात आहे तर काँग्रेस पक्षाकडे या मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रबळ इच्छुकामध्ये सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे माजी आमदार विजयराव खडसे किशोर दादा भवरे व मीनाक्षीताई सावळकर यांच्यासह अनेक जण उमेदवारीवर दावा ठोकून मतदार संघ पिंजून काढीत मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याचे दिसत असून यामध्ये सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघात मागील बऱ्याच दिवसापासून सामाजिक कार्याचा झपाटा लावल्याचे दिसत आहे तशाच प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांच्या जोरदार हालचाली सुरू असून यात मोहनराव मोरे यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे देखील बोलल्या जात आहे.
कांबळे च्या सामाजिक कार्याने काँग्रेस जन अचंबित गेल्या कित्येक दिवसापासून संपूर्ण
विधानसभा मतदारसंघ पिंजून काढीत उमरखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेला भेडसावीत असलेल्या समस्यांचा परिपूर्ण अशा पद्धतीने अभ्यास करून ज्या पद्धतीने साहेबराव कांबळे वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक कार्य करीत आहेत ती साहेबराव कांबळे यांची सामाजिक कार्य करण्याची पद्धत पाहून कॉंग्रेस जण देखील अचंबित झाल्याचे दिसत असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल पक्षश्रेष्ठी कडून घेतल्या जाईल व साहेबराव कांबळे यांच्या उमेदवारीवरच कॉंग्रेसकडून मोहर लागणार असल्याचे मत काँग्रेस पक्षाच्या गोटातून ऐकायला मिळत आहे.