बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी एक विमान कोसळलं होतं. आज पुन्हा विमान कोसळलं आहे. अपघातग्रस्त विमान हे रेडबर्ड फ्लाईंग ट्रेनिंग सेंटरचं आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरात असलेल्या सह्याद्री काऊ फार्म परिसरात या विमानाचा आज सकाळी अपघात झाला.
या विमानामध्ये पायलट ट्रेनर व प्रशिणार्थी होता, अपघातामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.