पनवेल-सध्या महाराष्ट्रत नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.सर्वच ठीकाणी रास-गरबा नृत्याचे कार्यक्रम होत आहे.खांदा काॅलनी येथील सत्यम सोसायटीत दुर्गामातेची स्थापना करण्यात आली आहे. महिलांचा आनंद द्विगुणीत होत आहे.
जनजागृती सेवा संस्थेने नेहमीच कर्तृत्ववान महीलांचा सत्कार केलेला आहे.त्याच अनुषंगाने या नवरात्रोत्सवात खांदा काॅलनी येथील सत्यम सोसायटीतील वेदांगी देसाई,विमला पुजारी,गायत्री चकोट,मोना सिंग,संगिता टकले,संध्या चकोट,पुर्वी जाधव,रुपाली सोरटे,आरती देवरुखकर या नऊ कर्तृत्ववान महीलांना संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व संस्थेचे सहचिटणीस सौरभ टकले यांच्या हस्ते"नवदुर्गा सन्मानपत्र"प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेची माहिती उपस्थितांना सांगितली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंधाली तिरपणकर,संतोष टकले,प्रशांत देवरुखकर,किरण सोरटे,संगिता टकले,चेतन टकले यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच महाराष्ट्रातील विशेष प्राविण्य प्राप्त कर्तृत्ववान महीलांचा त्यांना ऑनलाईन पध्दतीने आकर्षक"नवदुर्गा सन्मानपत्र"पाठवुन सन्मान केला आहे.