विशेष प्रतिनिधी, अँड पंकज जामनिक
लाखपुरी : मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे दि.१७/०९/२०२३ ला नेहरू युवा केंद्र अकोला व ग्रामपंचायत कार्यालय लाखपुरी यांच्या संयुक्त विद्यामानाने भारतभर साजरा होणारा "मेरी माटी मेरा देश" मोहीम अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय लाखपुरी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंदन यांचे पूजन करून संपूर्ण गावांमध्ये "अमृत कलश यात्रा" ला सुरुवात केली. यावेळी 'मेरी माटी मेरा देश', 'वंदे मातरम', 'भारत माता की जय', यात्रांमध्ये घोषणा देण्यात आली.
दिल्लीत 'अमृत वाटिका' तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमध्ये माती घेऊन 'अमृत कलश यात्रा' काढण्यात येणार असून ही अमृतवाटिका 'एक भारत श्रेष्ठ भारत' या वचनबद्धतीचे प्रतीक आहे आणि याच उद्देशाने लाखपुरी या गावांमध्ये कलश यात्रा काढून प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन कलश मध्ये माती गोळा करण्यात आली.
भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीच्या मानसिकतेला दूर करणे, आपल्या समृद्धी वारशाचा अभिमान बाळगवणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकांची कर्तव्य पार पाडणे आणि देशाचे संरक्षण करण्याप्रती आदर व्यक्त करणे यावर लक्ष केंद्रित करून पंचप्राणांची प्रतिमात्मक प्रतिज्ञा घेतली.
संपूर्ण अमृत कलश यात्राचे आयोजन नेहरू युवा केंद्र अकोलातील मूर्तिजापूर तालुक्याचे कोऑर्डिनेटर रिंकू अनिल भटकर , लाखपुरी येथील सरपंच राजप्रसाद कैथवास , ग्रामविकास अधिकारी गोवर्धन जाधव,ग्रा.प.सदस्या दुर्गाताई भोपत ,ज्योतीताई लोखंडे , वंदनाताई उघडे , रश्मीताई चव्हान,ज्योसनाताई जामनिक , ग्रा.प.सदस्य नितीन सुरजुसे , रामराव देशमुख,फिलीप जामनिक , संगणक परिचालक अतुल नवघरे , ग्रा.प. कर्मचारी जगदिश सुरजुसे,स्वामी.विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष अजय तायडे ,श्रीकांत देशमुख , सुशिल जामनिक , दत्ता जामनिक सह शालेय विद्यार्थी व इतर सदस्य अमृत कलश यात्रेमध्ये उपस्थित होते .
संपूर्ण अमृत कलश यात्रा मोठ्या उत्साहात व आनंदात नागरिकांमध्ये संपन्न झाले.