नांदेड जिल्हा प्रतिनिधी बालाजी शेवाळे
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच औचित्य साधून आयुष्यमान मोहीमे अंतर्गत क्षय रुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले आहे.
क्षय रुग्णांना फुड बास्केट वितरणासाठी शासनाकडून एक दिवसीय विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून,राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत कम्युनिटी सपोर्ट टू टी.बी. पेशंट उपक्रमात क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना मोफत पोषण आहार देण्यात यावा. यासाठी क्षयरोगाचा उपचार घेत असलेल्या व संमती दिलेल्या क्षय रुग्णांना पोषण आहार ' फुड बास्केट ' व इतर आवश्यक मदत ज्यांना द्यावयाची आहे अशांनी संपर्क करून निश्चय मित्र बनावे असे आवाहन आरोग्य विभागा मार्फत करण्यात आले होते.
याच अनुषंगाने बरबडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्षय रुग्ण औषधोपचार घेत असताना त्यास योग्य पोषण आहार भेटून तो क्षय मुक्त व्हावा..
या उद्देशाने फूड बास्केट म्हणून एका क्षयरुग्णास एक महिन्यासाठी पूरक पोषण आहार ज्यात गहू तीन किलो, शेंगदाणे अर्धा किलो,गूळ एक किलो, तेल एक किलो,तांदूळ तीन किलो, मटकी एक किलो,मूग एक किलो देण्यात आले आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पबितवार,आरोग्य सहाय्यक गजानन संगेवार, प्रवीण सारडा, श्रीमती सोनकांबळे, आरोग्य सेविका प्रियंका नुगुरवार यांच्यासह आशा सेविका यांची उपस्थिती होती.