उन्नतीच्या मार्गातील दुवा म्हणजे पत्रकार - आमदार प्रकाश भारसाकळे

 




हिवरखेडात ए जे एफ सी पत्रकार मित्र संघटनेचा जिल्हा मेळावा उत्साहात साजरा

 




मूर्तिजापूर - समाज उन्नतीच्या मार्गातील महत्वाचा घटक म्हणजे पत्रकार समाजातील प्रगती अधिक वेगवान करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. हा दुवा संघटीत असल्याचा प्रत्यय ए जे एफ सी च्या अकोला जिल्हा मेळाव्यात येत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केले ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.




      या शानदार मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी जि प सदस्यां सुलभा दुतोंडे तर प्रमुख अतिथी कृऊबास चे सभापती सुनील इंगळे , प स सदस्य गोकुळा महेंद्र भोपळे ,सरपंच वैशाली गणेश वानखडे , उपसरपंच रमेश दुतोंडे ,ठाणेदार गोविंद पांडव ,सुरेश नाठे , ए जे एफ सी चे केंद्रीय सदस्य निलेश पोटे ,प्रदेश कार्याध्यक्ष राहुल कुलट ,विदर्भ उपाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर , जिल्हाध्यक्ष किरण सेदाणी , जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार चिंचोळकर ,वरिष्ट पत्रकार गणेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते . या वेळी प्रास्ताविकात ए जे एफ सी चे जिल्हाध्यक्ष किरण सेदाणी यांनी राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटन ए जे एफ सी च्या उपक्रमाची माहिती दिली .तसेच पत्रकार मित्र मेळाव्याच्या आयोजनामागचा उद्देश विषद केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले .या वेळी पत्रकारांच्या गुणवंत पाल्याचा गौरव प्रशस्तीपत्र गौरव चिन्ह देऊन करण्यात आला .दुसऱ्या सत्रात ए जे एफ सी संघटने चे केंद्रीय सदस्य निलेश पोटे ,प्रदेश कार्याध्यक्ष राहुल कुलट , विदर्भ उपाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर , जिल्हाध्यक्ष किरण सेदाणी ,कार्याध्यक्ष राजकुमार चिंचोळकर ,जिल्हा उपाध्यक्ष ,मनीष भूडके , अशोक झामरे ,अमर मुंडाले ,प्रशांत ठाकरे ,अमोल बढे ,जिल्हा सचिव प्रा .एल डी सरोदे , संघटक रवी कोल्हे ,सरचिटणीस शामराव सुलताने ,हारूण देशमुख ,रितेश टिलावत ,सुनील धुरडे ,सचिन कोरडे ,तालुका अध्यक्ष स्वप्नील सरकटे,गोवर्धन गावंडे ,सुनील बजाज,केशव कोरडे,जितेंद्र लाखोटीया, शहरअध्यक्ष फारूख सौदागर ,जमीर शेख,विठ्ठल बागडी,राहुल गिर्हे, प्रदिप पाटील आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच प्रा संतोष राऊत व मनोज भगत यांचा सत्कार करण्यात आला या वेळी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल च्या कामांचा आढावा घेण्यात आला .संघटनेच्या पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले . या वेळी जिल्हा व तालुका पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत सन्मानित करण्यात आले .मेळाव्याचे संचालन व आभार प्रदर्शन महेंद्र कराळे यांनी केले .या वेळी अकोला जिल्ह्यातील ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post