औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
फर्दापूर येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड संचलित माणिकराव पालोदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फर्दापूर ता. सोयगाव या विद्यालयाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश प्राप्त केले असून 14 वर्षे वयोगट कुस्ती स्पर्धेत आयान इरफान पठाण याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 17 वर्ष वयोगटात सुमेर याकूब तडवी याने प्रथम क्रमांक मिळवला तर मुलींमध्ये 17 वर्षे वयोगटात कुमारी सृष्टी सिद्धार्थ तायडे हिने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच क्रिकेट स्पर्धेमध्ये 14 तसेच 17 व 19 वयोगटात मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे पणन अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब, संस्थेचे सचिव तथा सिल्लोड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब, प्रशासकीय अधिकारी रईस खान सर, संचालक शेख जावेद हाजीसाहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. के. शिंदे, क्रीडा शिक्षक एच डब्लू काकडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.