विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - दीड लाखाच्या घरफोडीचा सुगावा तीन दिवसात लावून चोरट्यांना जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले. मूर्तिजापूर शहरातील प्रतिक नगरात रहाणारे सेवानिवत्त मुख्याध्यापक रामदास कुंभारे पुण्याला त्यांच्या मुलीकडे गेले होते. दिनांक २८ ऑगस्ट रोजी त्यांना त्यांच्या पत्नीच्या मोबाईल वर त्यांच्या पत्नीच्या एटीएम मधून अनुक्रमे नऊ हजार चार वेळा तसेच तीन हजार, दहा हजार, ३० हजार व पाच हजार, असे ८४ हजार रुपये काढण्यात आल्याचा मॅसेज आला. एटीएम घरी असल्याने त्यांना संशय आला. म्हणून त्यांनी शेजाऱ्यांना विचारणा केली आणि आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी घरी येऊन बघीतल्यानंतर घरातील एक लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. शहर पोलिसांनी लगेच ता. २९ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदविला. ठाणेदार भाऊराव घुगे यांनी तपास चक्रे फिरविली. त्यांनी डीबी स्कॉडला गुन्ह्याचा तपास करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तपास पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे कुंभारे यांच्या एटीएममधून ८४ हजार रुपये काढण्यात आले होते.
त्या दर्यापूरच्या बाजार समिती जवळील पेट्रोल पंपावर जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज घेतले. एक इसम तोंडाला रुमाल बांधून पेट्रोल पंपाहून एटीएमद्वारे रुपये काढताना दिसला. त्याच्या तोंडाला पूर्णपणे बांधला होता. परंतु, त्याच्या चालण्याच्या लकबीवरून गुप्त माहितीच्या आधारे तेजस संजय दरेकर (वय २० रा. गुप्ता नगर परतवाडा), रोशन किरण सरदार (वय २६ रा. रवी नगर, परतवाडा) या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख १४ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपी सध्या अटकेत आहेत. ही कारवाई ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक श्री. वानखडे, सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, मंगेश विल्हेकर, सचिन दांदडे, सचिन दुबे, गजानन आडे, स्वप्निल खाडे यांनी केली असून, या कारवाईबद्दल येथील शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.