महागाव नगरपंचायतीमध्ये विविध समित्या सभापतींच्या निवडी

 





 जिल्हा विशेष प्रतिनिधी,श्रीकांत राऊत यवतमाळ 


महागाव : शुक्रवारी (ता.०१) रोजी महागाव नगरपंचायतमध्ये विविध विषय समित्यांची निवड झाली आहे. २१ ऑगस्ट २०२३ रोजी महागाव नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली होती. त्यानंतर तीन दिवसानंतर दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजी महागाव नगरपंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनंदा सुरोशे व उपनगराध्यक्ष म्हणून प्रमोद भरवाडे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. शुक्रवारी (ता.०१) रोजी महागाव नगरपंचायत कार्यालयामध्ये होऊ घातलेल्या सभेमधून विविध विषय समित्याच्या सभापती पदांच्या निवडी करण्यात आल्या. या निवडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा सुनंदा सुरोशे यांची स्थायी समितीच्या सभापती पदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना (उ.बा.ठा) गटाचे उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांची पाणीपुरवठा सभापती म्हणून निवड करण्यात आली. तर शिवसेना (उ.बा.ठा) गटाचे गटनेते विशाल पांडे यांची आरोग्य सभापती म्हणून निवड झाली आहे. याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेविका रूपाली कोल्हेकर यांची महिला व बालकल्याण सभापती पदी निवड झाली असून नगरसेविका सुनिता डाखोरे यांची उपसभापती महिला व बालकल्याण पदी निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सभापतींच्या विविध विषय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित आरोग्य सभापती म्हणून नगरसेवक विशाल पांडे यांची निवड झाल्यामुळे त्यांचे तसेच इतर समित्या सभापतींचे महागाव शहरात अभिनंदन होत आहे.        

            



महागाव शहरात सध्या पावसाच्या उघाडीमुळे मोठ्या प्रमाणात डास तसेच चिलटांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. तेव्हा "नवनिर्वाचित आरोग्य सभापती " यांनी महागाव नगरीमध्ये हायड्रोक्लोराइड फवारणी करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. जेणेकरून डेंगू मलेरिया या रोगाचे निर्मूलन होऊ शकेल. अशी महागाव वाशियांची रास्त मागणी आहे.




Post a Comment

Previous Post Next Post