श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते कुऱ्हा मार्गे भव्य कावड यात्रा जल्लोषात संपन्न;

 



हजारो युवकांनी खांद्यावर कावड घेऊन घातले महादेवाला साकळे


                    प्रतिनिधी ,शशांक चौधरी -


जटाधारी कावड यात्रा कुऱ्हा च्या वतीने आयोजित श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते वंडली -मारडा कुऱ्हा मार्गे भव्य कावड यात्रा जल्लोषात आणि हजारो युवकांच्या उत्साहात संपन्न झाली. सर्वप्रथम पहाटे ५ कौंडण्यपूरच्या वर्धा नदीपात्रातून जल घेऊन आणि कावड खांद्यावर घेत हर हर महादेव च्या जयघोषात हि यात्रा कुऱ्हा च्या दिशेने मार्गस्थ झाली. या कावड यात्रेचे वंडली मारडा आणि त्यानंतर कुऱ्हा येथे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

        त्याचबरोबर फराळ, दूध तसेच फळ वाटप सुद्धा करण्यात आले. आणि अगोदरच्या दिवशी सुद्धा विठाई चॅरिटेबल ट्रस्ट कौडण्यपूरच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे कडाक्याच्या उन्हात या युवकांच्या पायाला जेव्हा चटके बसत होते तेव्हा भाविकांनी झाडांची पाने आणि गवताचा आसरा देत रखरखत्या उन्हामध्ये मायेची सावली देतानाच नयनरम्य दृश्य यावेळी पाहायला मिळालं. 


      देवी देवतांच्या मूर्ती आणि कावड खांद्यावर घेऊन डीजेच्या तालावर हर हर महादेव चा गजर करीत कुऱ्हा नगरीत आगमन होताच संपूर्ण कुऱ्हा वासियांनी या कावड यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. आणि त्यानंतर महादेव मंदिर येथे राजेश वानखडे यांच्याहस्ते जलाभिषेक व पूजन करून या कावड यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार गीता तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस सागर निमकर, अनिल निंघोट यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post