समर्पित कार्यकर्त्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे.. सांसद रामचरण बौहरा..
डॉ. रविंद्र भोळे नारायण सेवा पुरस्काराने सन्मानित
पुणे - देशामध्ये विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या निवडक कार्यकर्त्यांना नारायण सेवा पुरस्कार प्रदान करताना मला विशेष आनंद होत आहे. अशा कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रात नवचेतना निर्माण होऊन राष्ट्रभक्ती वाढीस लागते. समर्पित भावनेने सेवा कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मूल्यमापन होणे महत्त्वाचे आहे असे मत संसद रामचरण बौहरा यांनी येथे व्यक्त केले.
श्री नारायण मानव सेवा समिती यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर नारायण सामाजिक पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जयपूर येथे फाइव स्टार हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय महिला वर्ड बॉडी चॅम्पियन प्रिया सिंह, डी.आई नीतू गोठवाल, फोर्टी अध्यक्ष डॉ. अरुण अग्रवाल, आंतरराष्ट्रीय मुंच्छ स्वामी जनकराज उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील नारायण सेवा पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित झाला.
यावेळी मध्य प्रदेशातील बनवारीलाल जाजोदिया लेखन व समाजसेवा लेखन व समाजसेवा, उत्तर प्रदेश येथील डॉक्टर अजित कुमार जैन शिक्षा एवं कवी, डॉक्टर अनुपजी मिश्रा हृदयरोग चिकित्सक, महाराष्ट्रातून डॉ. रवींद्र भोळे समाजसेवा नैसर्गिक आपत्ती विकलांग सेवा, हरियाणा मधून मोहन कृष्ण भारद्वाज, महामंडलेश्वर योगी राजेश नाथ, हबीब कुशवाह गुजरात, खुशबू शर्मा जयपूर, डॉक्टर अभिमन्यू पराशर एवं बालकृष्ण शास्त्री राजस्थान यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजनश्री नारायण सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रमोहन चेहिता, समितीचे सल्लागार मुकेश अग्रवाल, उपाध्यक्ष बबिता शर्मा, सुरेंद्र वर्मा ,बालकिशन लोधी, छोटेलाल कायत, दिलीप स्वामी ह्यांनी केले.