फर्दापूर पोलिसांनी ४८ तासांत चोरणाऱ्या ०३ चोरट्यांना केले जेरबंद




 फर्दापूर पोलिसाची धडाकेबाज कारवाई



 औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख



 सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलिसांनी ४८ तासात ट्रकचे टायर व डिक्स चोरणाऱ्या ०३ चोरट्यांना केले जेरबंद व त्याचे कडून चोरीचा मुद्देमाल पण १०० टक्के जप्त केला मा. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी जिल्ह्यातील चोरी करणाऱ्याचा चोरट्याचा शोध घेवुन त्यांना जेरबंद करण्याबाबत सूचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत यावरून सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे साहेब यांनी अशा गुन्ह्याचा जलद गतीने तपास करण्याबाबत मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस अनुन अशा घटनांना आळा बसणे कामी मार्गदर्शन केले फर्दापूर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर

१३४ / २०२३ भादवि कलम ३७९  प्रमाणे फिर्यादी नामे करंजीतसिंग चंचलसिंग भट्टल वय ४७ वर्ष व्यवसाय न्यू के एस ट्रान्सपोर्ट राहणार जबिदा इस्टेट शानुरवाडी जिल्हा औरंगाबाद यांनी 

 दिनांक ०५ / ०९ / २०२३ रोजी त्याचे मालकीचे  ब्रिस्टन कंपनीचे ट्रकचे दोन टायर व डिक्स असे एकूण ७२००० / रुपयेचा मुद्देमाल अज्ञात

आरोपीतानी चोरी केल्याबाबत फिर्याद दिलेली होती त्यानंतर फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे हे त्याचे तपास 

 पथकासह फर्दापूर शिवारातील धनवाट फाट्यावर

 व गावामध्ये तसेच राजकुवर महाविद्यालय च्या समोर ज्याठिकाणी चोरी झालेली होती त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे तात्काळ फिरवून ट्रक क्रमांक एम. एच. २६ एडी.३१४४ वरील ड्रायव्हर नामे अर्जुन पिता गौरीशंकर प्रसाद वय ३५ वर्ष राहणार थमणपुरा तालुका बासडी जि.बलिया राज्य उत्तर प्रदेश व क्लीनर नामे सुशील पिता शिवविलास प्रसाद वय २३ वर्ष रा. हलदी पोस्ट अलमपूर जिल्हा बलिया राज्य उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनीच सदरची चोरी केली आहे असे चौकशी मध्ये निष्पन्न झाल्यानंतर सदरचा मुद्देमाल कोठे आहे.

आरोपीला विचारले असता फर्दापूर गावांमधील टायरचे पंचर काढणारा इसम नामे मोहम्मद अजमल शेख वय २२ वर्ष रा. ह. मु. फर्दापूर मूळ रा. मु.पो. मगदूमपूर कुदरिया जि. मजफरपूर राज्य बिहार याने घेतलेले आहे असे समजल्यानंतर त्यास पण सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक करून ०३ दिवसाचा  पीसी आर घेतलेला असून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये त्याचे कडून ५२००० / रुपये किमतीचे ब्रिस्टन कंपनीचे दोन टायर व २०००० / रुपये किमतीचे दोन लोखंडी डिक्स असा एकून ७२००० / रुपये किमतीचा मुद्देमाल १०० टक्के रिकवर केलेला आहे.

    सदरची कार्यवाही पोलिसांनी ४८ तासाच्या आत केली आहे नमुद कार्यवाई  ही पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक  सुनील लाजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे याचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे पो.ना. निलेश लोखंडे पो.कॉ योगेश कोळी पो.कॉ प्रकाश कोळी भरत कोळी सतीश हिवाळे प्रदीप बेदरकर जगदीश सोनवणे आनंद पगारे यांनी मिळून केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post