सिटी तायक्वांडोच्या खेळाडूंसह मिशन चंद्रयान ३ च्या यशस्वीतेचा जल्लोष : रॅली आणि फटाक्यांची आतिषबाजी

  


        


                     विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मूर्तिजापूर - चंद्रयान-३ मोहिमेअंतर्गत पृथ्वीवरून चंद्रावर पाठविलेले लॅन्डर विक्रम यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर उतरले आणि जगात भारताने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.याचा एकच जल्लोष सर्वत्र सुरू झाला. 

        भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परिश्रमाचे यश असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होऊ लागल्या. शहरात अनेक भागात फटाके फोडून या ऐतिहासिक यशाचा जल्लोष करण्यात आला. येथील ग्रामीण पत्रकार संघ,मुर्तीजापुर स्वच्छता अभियान मुर्तीजापुर आणि सिटी तायक्वांडो क्लब यांच्या वतीने चंद्रयान ३ चे विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्रावर उतरल्याचा जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून आणि मिठाई वाटून करण्यात आला. सिटी टायकोंडोच्या चिमुकल्यांनी जे.बी.हिंदी हायस्कूल येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून राष्ट्रध्वज तिरंगा हाती घेऊन रॅली  काढून सहभाग घेतला.भारत माता की जय,वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. यावेळी स्वच्छता अभियानाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी,विलास नसले,रोहित सोळंके,दिनेश श्रीवास,संतोष माने, अंकुश अग्रवाल,गौरव अग्रवाल,मोईज शेख, गजानन वरघट सर,रवी गोंडकर,ज्ञानेश देशपांडे, ज्ञानेश टाले,कमलाकर गावंडे, प्रतीक यदवर यासह सिटी तायक्वांडो क्लबचे खेळाडू व पालक यांचा सहभाग होता.

Post a Comment

Previous Post Next Post