मूर्तिजापूर ,विदर्भ संपादक मिलिंद जामनिक- तालुक्यातील लाखपुरी येथे अवैधरीत्या देशी व गावरान दारु विक्री सुरु असल्याची गुप्त माहितीवरून ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली असता दारु विक्री करणाऱ्या आरोपीस रंगेहात पकडून करवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना मिळालेला गुप्त माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक रणजित खेडकर,घनश्याम पाटील, पोलिस कॉन्स्टेबल गजानन सायम, शंकर खेडकर यांनी लाखपुरी येथे धाड टाकली असता, आरोपी सुभाष नारायण सातरोटे हा स्वतःच्या राहत्या घरात देशी व गावरान दारु विक्री करताना दिसताच त्यास रंगेहात पकडून त्याच्या जवळून गावरान दारु किंमत १ हजार ५०० व देशी दारु २ हजार ८०० असा एकूण ४ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडकर करीत आहेत.