शाळेबाहेरची शाळा कार्यक्रमात नमन सोबतच त्याच्या बाबांची ही घेतली मुलाखत
मूर्तिजापूर - शाळेबाहेरची शाळा हा अभिनव उपक्रम विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर ,प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि जी.प
.नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जातो.
त्या अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील दताळा या गावातील जी.प. प्राथमिक शाळेतील वर्ग 4 थी चा विद्यार्थी नमन भोंडे व त्याचे बाबा गणेश भोंडे यांची मुलाखत घेतली.
शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमाचा 498 वा भाग मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 ला सकाळी 10.35 प्रसारित करण्यात आला. हा अभिनव उपक्रम संपूर्ण कोविड काळापासून प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून नागपूर आकाशवाणी 'अ' (512•8) केंद्रावरून मंगळवार, गुरुवार, व शनिवारला हा कार्यक्रम प्रसारित होतो.यामध्ये अंगणवाडी ते 8 वी च्या वर्गाचा अभ्यास घेतला जातो. मुले माता पालकांच्या मदतीने तो अभ्यास पूर्ण करतात. या कार्यक्रमात नमन ला "घड्याळात किती वाजता तास व मिनिट काटा एकमेकांशी काटकोन करतात? अशाप्रकारचा गणित विषयावर अभ्यास दिला होता व त्यावर त्याच्याशी चर्चा करण्यात आली .त्यावेळी नमनने चांगल्या प्रकारे सविस्तर माहिती सांगितली . नेहाच्या बाबाने पण आपल्या मुलाबद्दल ,अभ्यासाविषयी व सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगितले.
या कार्यक्रमा करिता जि प शाळा दताळा शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कडू ,निलेश भारसाकळे यांनी परिश्रम घेतले. तसेच गावातील सरपंच मयुरी खांडेकर ,उपसरपंच वृषाली सोनोने , पोलीस पाटील काकड , मिलिंद खांडेकर , ओंकराराव गवळी,सुनील काकड ,प्रथमचे भावेश हिरूळकर यांनी नमन चे कौतुक केले व यावेळी छोटेखाणी कार्यक्रम घेऊन नमन आणि त्याच्या वडिलांना उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.