बदलापूरचे सौंदर्य अबाधित रहाण्यासाठी नानासाहेब देशमुख यांचे अविरत प्रयत्न






बदलापूर- कवट्याची वाडी शिरगांव डोंगरराजीतून उगम पावणारा ओढा पनवेल रोड ओलांडून मोहनपाम मार्गे रामनगर,सरस्वती नगर डाॅ.प्रकाश आमटे उद्यान अटलबिहारी गॅलरीतून कात्रप स्टेशन रस्ता रेल्वे लाईन ओलांडून मांजर्लि हेंद्र्याचा पाडा मार्गे उल्हास नदीला मिळतो.हा ओढा म्हणजे नदीचे लहान रुप आहे.

हा ओढा पनवेल रोडवर येईपर्यंत बिल्डरांनी आकार कमी करून वळण देत आक्रसिला आहेच,पण पनवेल रोड ओलांडल्यानंतर कडेच्या एका बिल्डरने ओढ्यावरच अर्धे काम केले आहे.नंतर मोहनपामने पायाखाली घेऊन गटार करून राऊत चौकातुन रामनगर मध्ये वळविला आहे.ओढा वळविण्यात आल्यानंतरही अतिक्रमण चालु आहे.आणि सरस्वती नगरात आक्रिसला आहे.





थोडा पाऊस झाला की घरात पाणी उलटे शिरते.आणि बिल्डरांनी ओढ्याची रुंदी कमी करुन आता ओढा नाही म्हणून नाल्यात सोडण्यात येणारी गटाराची तोंडेच बंद केली आहेत.

त्यामुळे पावसाळ्यात पाणी वहाते व चालणे जिकरीचे होते.या दरवर्षीच्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यासाठी व नाल्यातील अतिक्रमणे दुर करण्यासाठी ज्ञानेश्वर(नानासाहेब)देशमुख यांनी नमस्ते बदलापूर मंच स्थापन करुन प्रशसानाशी लढा पुकारला आहे.

बदलापूर शहराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांची साथ हवी,मंचच्या पाठपुराव्यामुळे नाल्यातील अतिक्रमण थांबले आहे.याकामी सिटीझन वेल्फेअर असोसिएशन व महानगर विकास कृती समिती यांची मोलाची साथ लाभली.

अजूनही शहरातील इतर सामाजिक संस्था,संघटनांकडून साथ मिळाली पाहीजे असे नमस्ते बदलापूरचे मंचचे संस्थापक नानासाहेब देशमुख यांनी सांगितले,तरच बदलापूरचे ओढे अबाधित राहतील.

Post a Comment

Previous Post Next Post