लायन्स क्लब सावर्डे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

  







    दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांच्या वतीने ला.डॉ. अमोल निकम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडकी नं. 1 या शाळेत मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

   15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य् साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडकी नं.1 ता.चिपळूण तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या माध्यमिक येथे लायन्स क्लब सदस्य सदस्य ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते. सदर वेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष ला.डॉ.निलेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.





   तसेच लायन्स क्लब चे सदस्य ला.डॉ.अमोल निकम यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील गरजू विद्यार्थाना ,दप्तरे,वह्या ,पेन ,

पेन्सिल या शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.





सदर कार्यक्रमाच्या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.निलेश पाटील,MJF ला.गिरीश कोकाटे ,ला.कृष्णकांत पाटील,ला.सीताराम कदम,ला.डॉ.अमोल निकम,ला.अशोक बिजितकर, ला.विजय राजेशिर्के, ला.वर्षा खानविलकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,आणि सदस्य ,तसेच शाळेचे मुख्याध्यापक भिवसे सर,भुवड सर ,तसेच शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.





   लायन्स क्लब सावर्डे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा सावर्डे नं.1 ,जिल्हा परिषद शाळा मांडकी नं.1 तसेच सह्याद्री शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश स्कुल सावर्डे या शाळेतील विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post