सारथी च्या वतीने मराठा युवकांना मोफत संगणक प्रशिक्षणा चा लाभ घ्यावा - रोशनी कंप्युटर चे संचालक किरण हनमंते यांचे आव्हान

 




नांदेड प्रतिनिधी बालाजी शेवाळे: कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी बरबडा येथील शासनमान्य अधिकृत केंद्र रोशनी कंप्युटर एज्युकेशन याठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण सुरु केले असुन मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे रोशनी कंप्युटर चे संचालक किरण हनमंते यांनी केले आहे.




छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र सारथी संस्थेचा उपक्रम महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन पुणे या प्रशिक्षण संस्थे मार्फत बरबडा या ठिकाणी अधिकृत केंद्र आहे. या ठिकाणी उमेदवार यांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. हे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख तीस आहे. 

याची प्रवेश क्षमता कमी असल्यामुळे जास्तीत जास्त विधार्थी याने प्रवेश घ्यावे असे सांगितले आहे. यात कोणतेही 4 कोर्सेस घेता येईल त्याचा कालावधी 6 ते 8 महिन्याचा असेल असे सांगितले आहे तसेच बरबडा येथे होणाऱ्या 28 आणि 29 तारखेला होणाऱ्या ग्रामसभेत सविस्तर माहिती सांगण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्याने घ्यावे असे किरण हनमंते यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post