गिनीज वल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या राजपथ इन्फ्राकोन प्रा. लि कडून वकील बंधुना केले सन्मानित...

 




  राजपथ इन्फ्राकोन प्रायव्हेट लमिटेड संस्थेकडून त्याचे अमरावती महामार्गावर असणाऱ्या कार्यालयात भव्यदिव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. ज्यामध्ये कंपनीचे प्रभारी अध्यक्ष व निर्माणकर्ता जगदिश कदम यांचे हस्ते गिनिज वल्ड रेकॉर्ड बनवण्यामध्ये सहभागी होणाऱ्या विविध क्षेत्रातील सन्माननीय इंजिनियर, ॲडव्होकेट, कंपनीचे रस्ते निर्माणअधिकारी, व ज्या ज्या लोकांनी हा रोड वेळेत पूर्ण असे सगळ्याचे आभार मानले. दि. 07 जून 2022 रोजी अकोला ते अमरावती महामार्ग क्र. N.H 55 रोडवर 75 कि.मी. लांबीचा हा रोड 105.तास 33 मिनिटांत वेळेत पूर्ण करून विश्व रेकॉर्ड गिनिज वल्ड मध्ये हा सगळ्यात कमी वेळात 75 की.मी रोड निर्माण करण्याचा रेकॉर्ड आपल्या नांवे करून देशाचे व आपल्या राज्याचे नांव उंचावले आहे. देशाचे नांव गिनिज वल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट होण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांनी परीश्रम घेतले , जिवापाड मेहनत केली व ह्या विश्व विक्रमाची वेळेत काम करून याची आपल्या नांवे नोंद केली त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले यासाठी राजपथ कंपनीचे प्रमुख अध्यक्ष कदम यांचे कडून विविध क्षेत्रातील आलेली मंडळी ज्याचा या विश्व विक्रमामध्ये हातभार लागला..


अशा सगळ्यांना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये विधीज्ञ मंडळींना ही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. ज्यामध्ये ॲड. प्रशांत एस.भडांगे, ॲड. अजिंक्य धर्माधिकारी, ॲड. प्रदिप.पी. पाटील,ॲड. विनोद सोनटक्के, ॲड. श्रद्धा गुल्हाने, ॲड. राधिका काळे, ॲड. नरेंद्र काळे, ॲड. शरद मेहरे, यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचं बरोबर याच महामार्गावर भव्य दिव्य असे टॉवर उभे करून त्यावर या रोडच्या निर्माण करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या जवळपास 750 पेक्षा ही अधिक लोकांची नांवे या टॉवर वर कोरण्यात येणार असल्याची माहिती राजपथ इन्फ्रा कंपनी प्रमुखांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post