विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधीत तंबाखू ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपी कडून ग्रामीण पोलीसांनी जप्त केला आहे हि कारवाई दिनांक २७ ऑगष्ट रोजी केली.
प्राप्त माहितीनुसार ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आपल्या ताफ्यासह पोलीस स्टेशन हद्दीत दुर्गवाडा फाट्यावर नाकाबंदी केली असता, मोटार सायकलवर हिरव्या व पिवळ्या रंगाच्या दोन थैली घेऊन येणारा इसम जवळ येताच त्यांची विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तर देताच त्यास पोलिसी हिसका दाखवताच त्याने सुंगधी गुटखा असल्याची कबुली दिली.
पंचासमक्ष तपासणी केली असता मोटार सायकलवरील पिवळया व हिरव्या रंगाच्या थैलीत बाजीराव गोल्ड पान मसाला गुटखाचे पाकीटे, मस्तानी टोबॅको पाकीटे, विमल पान मसाला गुटखाचे ९००० प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखु पाकीटे तसेच सदर गुटखा विक्री करीता वापरण्यात आलेली ४५ हजारांची मोटारसायकल क्र.एम एच ३० ए जी १०९१ असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी भुपेंद्र देवसिंग बयस ( ३९ ) राहणार सिरसो याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कलम २२८, २७२, २७३, १८८ भादवी सहकलम २६ (२) ५९ अन्न सुरक्षा व मानके अधनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक रणजीत खेडकर , पो.कॉ. गजानन सयाम, शंकर खेडकर, घनश्याम सलाखे, इरफान अली यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील करीत आहेत.