नेरी काँग्रेस कमिटी यांच्या वतिने आनंदोत्सव साजरा

 



 सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली बाबत             


                


चंद्रपूर / चिमूर, सुनिल कोसे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला मा. सु प्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे, या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही, मनमानी व सुडबुद्धीच्या राजकारणातून राहुल गांधी यांना शिक्षा झाली होती. खोट्या तक्रारीच्या माध्यमातून भाजपाने हे षडयंत्र रचले होते. पण देशात अजून न्याय व्यवस्था आहे, या न्यायव्यवस्थेनेच भाजपा व मोदी सरकारचे मनसुबे उधळून लावले आहेत.

मा. सुप्रीम कोर्टाने शिक्षेला दिलेली स्थगिती हा सत्याचा विजय आहे. तरी हा विजय नेरी काँग्रेस कमिटी यांच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय पाटील गावंडे, प्रा. राम राऊत सर सेवादल सहसचिव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नेरी येथील पी एस सी चौक या ठिकाणी फटाके फोडून उपस्थितीत या घटनेचा उत्सव व भाजपा चा निषेध करण्यात आला आणि राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी नेरी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोरेश्वर जी वासेकर संजय डोंगरे, ओम खैरे उपाध्यक्ष, रवींद्र पंधरे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, विलास हरिभाऊ पिसे नेरी शिरपूर जि प सर्कल प्रमुख , प्रशांत पिसे, सुरेश नामदेव पिसे राजू पिसे , घनश्याम पिसे, प्रभाकर लोथे, घनश्याम वाघमारे , समशेर पठाण, सुभाष , मनोहर पिसे नेरी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल पिसे, संदीप तुळसकर निखिल पंधरे, अयफाज पठाण, गोलू सोरदे ,दिलीप वैरागडे, श्रीकांत गेडाम, तसेच सौ भावनाताई पिसे दुर्गा वैरागडे,तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला मंडळ ,युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post