(शाळेत मुलाला झालेल्या मारहाणीची चौकशी करण्यास गेलेल्या पालकाला उद्धट वागणुक)
महागाव तालुका प्रतिनिधी श्रीकांत राऊत
इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीची चौकशी करण्यास गेलेल्या पालकाला शाळा व्यवस्थापन करून उर्मट व उद्धट वागणुक देण्याचा प्रकार घडला असुन विद्यार्थ्याच्या सुरक्षेसंदर्भात बेजबाबदारपणा करणाऱ्या शाळा व्यवस्थापनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे
महागाव शहरातील नामांकित असलेल्या एल के इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गल्लेलठ्ठ डोनेशन घेवुन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो परंतु येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे दृष्टीने शाळा व्यवस्थापन उदासीन असल्याचे दिसून येते असाच प्रकार दिनांक ४ ऑगस्ट रोजी घडला या शाळेत वर्ग ६वी मध्ये शिकणाऱ्या यश रवी खेडकर या विद्यार्थ्याला सहकारी विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर ईजा झाली याबाबत त्याचे पालक शाळेत चौकशी करण्यास गेले असता शाळा व्यवस्थापनाने त्यांना आम्हाला काय फक्त मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या भांडण सोडविण्याचे काम आहे का?तुमच्या मुलाने कशाला भांडण केली? अशी उर्मट उद्धट भाषेत बोलुन तुम्ही कोठे ही जा अन्यथा तुमच्या मुलाला शाळेत पाठवु नका असा दमदाटी करीत उलट सल्ला दिला यावरून पालकांकडून लाखो रुपये गोळा करून शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या संस्था चालकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप पालक करीत असुन विद्यार्थ्याच्या सुरक्षेसंदर्भात हयगय करणाऱ्या या शाळेवर कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे
शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे.
शिक्षणाच्या नावावर आमच्याकडून भरमसाठ फी आकारणी केली गेली.नामांकित शाळा असल्याने पालक आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून या शाळेत आपल्या पाल्यांना टाकत आहेत .विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनेची असताना मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना न करता जबाबदारी झटकून उलट पालकांनाच दमदाटी केल्या जात आहे याकडे शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
:- रवी खेडकर(पालक)
कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन .
तालुक्यात अनेक ठिकाणी इंग्लिश मिडीयम स्कूल थाटून शिक्षणाचा बाजार मांडून पालकांची लूट केल्या जात आहे जिल्हा शिक्षण विभागाकडून तालुक्यातील काही शाळांना शाळा सुरू न करण्या संदर्भात पत्र सुद्धा आल्याचे ऐकण्यात आहे परंतु या संस्था चालकांनी शिक्षण विभागातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपली दुकानदारी चालुच ठेवली आहे .या शाळांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात शासनाने घालुन दिलेल्या मार्गदर्शक प्रणालीचे कोणतेच पालन सुद्धा होत नाही त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवुन तालुक्यातील इंग्लिश स्कूल व प्रतिबंधित करण्यात आलेल्या सर्व इंग्लिश मिडीयम स्कूल चालकांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पालक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी मनसे स्टाईल ने आंदोलन छेडू.
महेश कामारकर (तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महागाव)