27 दिवस उलटूनही शेतकरी नुकसाभरपाई पासून वंचितच
चंद्रपूर / चिमूर, सुनिल कोसे : चिमूर तालुक्यातील नेरी येथील शेतकरी पंकज रणदिवे यांनी दिनाक 27/06/2023 ला नेरी येथील आर्यन कृषी केंद्रातून SHRI YSR जातीचे RISING SUN SEEDS ची 4 बॅग धानाची बियाणे खरेदी केली. व त्याची धान पेरणी मशीनचा माध्यमातून दिनांक 30/06/2023 ल जवळपास 3 एकरात धान पिकाची पेरणी केली. मात्र 13 दिवस उलटूनही सदर शेतकऱ्यांची बियाणे वापलेच नाही. तर त्याच दिवशी पेरणी केलेले दुसऱ्या कंपनीचे बियाणे वापल्याने SHRI YSR ही बियाणे बोगस निघाल्याचे संशय शेतकऱ्याला पडला त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत पडलेला होता.
याबत आपली आपबिती कृषी केन्द्र चालकाला सांगितली त्यांनी माझ्या हातचं काहीच नाही सांगून याकडे दुर्लक्ष केले. तदनंतर शेतकऱ्यांनी कृषी केंद्र चालकाकडून कंपनीच्या माणसांशी संपर्क केला त्यांनी शेताची पाहणी केली मात्र काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांनी दिनाक 13/07/2023 ला, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, व तहसिलदार यांचे कडे आपली कैफियत मांडली. याचाच आधार घेत दि. 17/07/2023 ला व्हीं. जी. नगदेवते शास्त्रज्ञ, ज्ञानदेव तिखे तालुका कृषी अधिकारी चिमूर, एस. बी. साहारे पंचायत समिती चिमूर, महेश बल्डपवार कंपनी अधिकारी, सतीश मोहोड कंपनी प्रतिनिधी, यांच्याकडून शेतावर येऊन शेतीचा पंचनामा करण्यात आला. मात्र पंचनाम्याला 10 दिवस लोटूनही अधिकाऱ्यांनी नुकसाभरपाई बद्दल कोणतीही माहिती दिली नाही व पांचानाम्याची प्रत शेतकऱ्याला दिलीच नाही. त्यामुळे नेमका पंचनाम्यात काय उल्लेख केलं गेला आणि आपल्याला नुकसान भरपाई मिळणार की नाही याची कल्पनाही सदर शेतकऱ्याला मिळाली नाही.
अधिकारी यांनी शेतकऱ्याची व्यथा जाणून घेऊन तत्काळ पंचनामा करून सदर दोषींना नुकसानभरपाई देण्याची ताकीद देणे गरजेचे होते मात्र अधिकारी वर्गाने दिनाक 17 जुलै ला पंचनामा करूनही अजून पर्यंत त्याच अहवाल सुधा मिळालेला नसल्याने अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला असून दोषींना वाचविण्यासाठीच अधिकारी धडपड करीत आहेत की काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना बोगस बियाणे निघाल्यास तत्काळ कारवाही करून शेतकऱ्याला नुकसाभरपाईची देण्यात येईल अशी घोषणा लोक प्रतिनीधी करतात मात्र स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची या ना त्या कारणाने पिळवणूक करण्यात येत आहे. उगवणक्षमता नसलेले बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक होत असून यांना जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या उगवणक्षमता नसलेल्या बोगस बियाणे प्रकरणात कंपनी व कृषी केंद्र चालक यांनी हात झटकल्याने शेतकरी चिंतेत वाढ झालेली आहे.
एकीकडे पैसे नसताना उसनवार करून कसबस पैशाची जमवाजमव करून शेती करीत असताना जवळपास तीन एकरातील पिकाची दीड लाख रुपयाचे नुकसान झालेले असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. तेव्हा शासनाने याकडे तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्याला नुकसाभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.
याबाबतचा अहवाल आजच वरोरा येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
सरोज सहारे, कृषी विभाग पंचायत समिती चिमूर