शहर पोलिसांच्या सतर्कतेने चार गोवंशाना मिळाले जीवनदान





विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 


 मूर्तिजापूर - येथील शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून देवरन रोड वरून अवैधरित्या गोवंश कत्तली साठी जात असल्याच्या माहितीवरून पाळत ठेवली असता दुपारच्या दरम्यान चार गोवंशाना निर्दयी पणे बांधून नेत असताना मुद्देमालासह पकडुन कारवाई करण्यात आली.


     प्राप्त माहितीनुसार हे पो कॉ वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरात ठाणेदार भाऊराव घुगे, हेड पोलिस कॉन्स्टेबल वाघ, सचिन दुबे, वील्हेकर, सचिन दंडले, गजानन खेडकर पेट्रोलिंग करीत असता देवरण रोडवर चार गोवंश निर्दयीपणे दोराने बांधून पायी नेत असता त्यास पोलिसांनी हटकले असता उडवा उडवीचे उत्तर दिल्याने गोवंशाचे दस्तऐवज नसल्याने चार गोवंश अंदाजे किंमत ६०,००० ताब्यात घेऊन आरोपी मुक्त्यार अहमद अब्दुल रौफ वय ३८ राहणार खडकपुरा याच्या विरूद्ध कलम ५,५ (ब) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा अधिनियम २०१५) सहकलम ११ (१)(ड) प्राण्यांना निर्दयपणे वागविणे कायदा १९६० नुसार गुन्हा दाखल करून सदर गोवंश पुंडलीक बाबा गोरक्षण संस्थेच्या स्वाधिन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post