विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा उत्पादनाला दुप्पट भाव देण्याचे अभिवचन दिले असून त्या दिशेने केंद्र सरकारने योजना आखले आहेत. एकाच छताखाली वाजवी किमतीमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, आधी दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देणे, मृदा, बियाणे, खते चाचणी सुविधा शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाधिष्टत व परिपूर्ण सुविधा केंद्राशी सलगणीत करणे आदी कार्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात केंद्र शासन व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक योजना सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक बचत व्हावी सोबत त्यांची फसवणूक होणार नाही आणि शेतकऱ्यांना सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी अकोल्या जिल्ह्यात 155 कृषी केंद्रांमध्ये किसान समृद्धी सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून सर्वसामान्यांच्या सोबत घेऊन हा देश शक्तिशाली करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. राजस्थान येथील सिकोर येथून देशभरातील एक लाख 25 हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले असून अठरा हजार कोटी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले असल्याचे प्रतिपादन गुरवार दि 27 जुलै रोजी येथील सोमाणी कॉम्प्लेक्स येथील प्रकाश सोमानी कृषी सेवा केंद्रात आमदार हरीश पिंपळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हरिष पिंपळे होते, तर विनय वारे, उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, सचिन खरतडकर, बबलू भेलोंडे, संतोष भांडे, अमित नागवान, राहुल पाटील गावंडे, लखन अरोरा, सतीश डागा, अतुल बोंडे, अर्पित गावंडे, ओम मानकर, चेतन सदार, अतुल लाटा, गोपाल शर्मा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.