गोवंशाचे वाचविले प्राण ; ग्रामिण पोलीसांची कारवाई

 





आरोपीस अटक तिन लाखाचा मुद्देमाल जप्त






 मूर्तिजापूर - तालुक्यात गोवंश तस्करांनी हद्दच पार केली आहे.सतत गोवंश तस्करांवर कारवाई सुरू असल्याने महिनाभरात मुर्तीजापुर पोलिसांनी दीड-दोनशेच्यावर गोवंशांना जीवदान दिले आहे. यात आणखी भर म्हणजे आज दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक कानडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,मुर्तीजापुर वरून अकोल्याकडे जनावर कत्तलीसाठी घेऊन जात आहे.अशी विश्वासनीय माहिती मिळाल्यावर सदरची माहिती ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टॉप अक्षय रडके,पोलीस कॉन्स्टेबल सुदाम धुळगुंडे, पोलीस कॉन्स्टेबल रितेश मद्दी, पोलीस कॉन्स्टेबल विनोद तायडे,यांनी सोनोरी गावाच्या पुलावर नाकाबंदी केली असता, एमएच 30 बीडी 4335 टाटा इंट्रा वाहन अकोल्याकडे जात असताना इशारा देऊन थांबविले.सदर वाहनाचा तपास केला असता यामध्ये क्रुर व निर्दयतेने जनावरे कोंबून वाहतूक करताना दिसले.सदर वाहनात गोवंशीय जनावरांमध्ये 4 गोरे व 5 गाई असे एकूण 9 गोवंश जनावळे मिळून आली. त्याची एकूण किंमत 96 हजार व गाडी क्रमांक एम एच 3 बीडी 4335 टाटा इंट्रा वी30 किंमत 2 लाख 50 हजार असा एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष ताब्यात घेऊन वाहन चालक रिजवान उर रहमान मोबीन उर रहमान वय 28 खंगारपुरा, रामदास पेठ अकोला व अब्दुल रहीम शेख हुसेन राहणार मोहम्मद अली चौक अकोला या आरोपींवर कायदेशीर कारवाई करून ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम 5, 5 (अ ) महाराष्ट्र प्राणी अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1976 सहकलम 11(1)(ड)प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 सहकलम 184,177 मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक कानडे,पोलीस कॉन्स्टेबल अक्षय रडके,पोलीस कॉन्स्टेबल सुदाम धुळगुंडे,पोलीस कॉन्स्टेबल रितेश मद्दी, पोलीस कॉन्स्टेबल विनोद तायडे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post