चंद्रपूर,वरोरा : आशीर्वाद मंगल कार्यालय वरोरा येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व बचतगट पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते यांनी पाहुण्यांचे टाळ्यांच्या गजराने स्वागत केले.
मंचावर उपस्थितविभागीय अधिकारी इंगळे,म.वि.स.रुपेश शेंडे,आतेश अलि,अहमद माजी नगराध्यक्ष, वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर, अनिताताई पाटील सी. एम.आर .सी.अध्यक्ष, सोनल दांडगे अधिपरिचारीका, अमित मानकर विस्तार अधिकारी, भोयर नगरपरिषद वरोरा ईत्यादी उपस्थित होते.
सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करून दिपप्रज्वलन मान्यवरांनी केले.
आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
जशी आपण पैश्याची बचत करतो.तसेच आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आरोग्याची काळजी घेतली तर आपला बराच पैसा वाचतो आणि आपल्याला जास्त खर्च करावा लागत नाही.
आणि पैश्याची बचत होते.
आरोग्य चांगले राहण्यासाठी कायकाय करायला पाहिजे त्यांची उपाययोजना सांगितली.काही गोष्टी लहान/ लहान जरी असल्या तरी त्या पुढे जाऊन मोठे रूप धारण करू शकते येथे कॅन्सर विषयी सांगितले कॅन्सर किती भयानक असतो पण आपण वेळीच काळजी घेतली तर आपण आपलं जीवन वाचवू शकतो.
म्हणून आरोग्याची काळजी घेणे खूप जरुरी आहे. वरोरा मध्ये खूप जमिन पडीत पडुन आहे तेथे किंवा मक्तेदारीने शेती करावी आणि तेही शेंद्रीय शेती करावी असे आवाहन केले आहे.
आपले चांगलें खानपान, चांगले आचारविचार,रहनसहन ,समज गैरसमज जिवनात खूपच बदल घडून आणतात.आपण आपलीं संस्कृती नुसार न राहता पाश्चात्यांच्या पावलांवर पाऊल टाकत आहोत.जे आपल्या आरोग्यालाही हानीकारक आहे.
म्हणून आपलं भारतीय खानपान आचारविचार रहनसहन ही चांगली असायला पाहिजे.
काही खाद्य पदार्था विषयी गैरसमज असतात ते दुर केलेत . सामाजिक जाणीव ठेवून आपले व्यवहार असायला पाहिजे स्पर्धा मध्यें भाग घ्यायला पाहिजे.त्याने आपली उन्नती साधता येते.
प्रगतीच्या मार्गावर कसे पदक्रमन करायचे याविषयी मार्गदर्शन केले.
कूठल्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये, अश्यावेळी आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आणून आपण जिवन जगल पाहिजे.एकमेकांना समजून घेवुन वागल पाहिजे.आचार विचाराच योग्य मार्गक्रमण केलें पाहिजे.प्लाष्स्टिकचा वापर कमी, विजेची बचत,पाण्याची बचत, स्वच्छता, पर्यावरण,अवयव दान ,रक्त दान नेत्र दान ,देहदान दानं विषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी सर्व महिला मान्यवर उपस्थित होते.