विदर्भ : खेकडे पकडण्याच्या नादात सिंधी घाटजवळील वर्धा नदीत काल दिनांक 8 जुलै रोजी दुपारी बुडालेल्या त्या तीनही बालकाचे मृत्यूदेह आज शोधण्यात प्रशासनास मोठे यश आले, मृत्यूदेह पाहताच पालकानी हंबरडा फोडला तर ग्रामस्थानाही आश्रू आवरता आले नाही शनिवारी सकाळची शाळा संपल्यानंतर तोहोगाव येथील शिंदी घाटावर वर्धा नदीच्या पात्रात खेकडे पकडायला गेले, पाण्यात मौज-मस्ती करीत असताना तीन मुले वाहून गेल्याची दुदैवी घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे दि.8 रोजी दुपारी एक वाजता दरम्यान घडली होती. अंधार पडल्याने अपूर्ण राहिलेली शोधमोहीम ला आज मोठे यश येऊन तिन्ही मृतदेह काढण्यात आले.
तोहोगाव जिल्हा परिषद शाळेत शिकणारे शनिवार सकाळची शाळा असल्याने दिवसभर सुट्टी असल्याने प्रतीक जुनघरे, सोनल रायपुरे, निर्दोष रंगारी, आरुष चांदेकर हे बाराच्या सुमारास सिंधी घाटाकडे वर्धा नदीत गेले कपडे काडून तीन विद्यार्थी पाण्यात शिरले, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते तिघेही वाहून गेले आणि आरुष चांदेकर हा वाचला अशी घटना घडली होती.
घटनेची माहिती कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड यांना देताच विलंब न करता घटना स्थळ गाठून जिल्हा आपत्कालीन विभागाकडे बोटीच्या मदतीची मागणी केली. पथक येण्यास विलंब असल्याने त्यांच्यावर अवलंबून न राहता शोध घेतला, काही वेळाने आपात्कालीन शोध पथक दाखल होऊन शोध घेतले पण रात्री शोधमोहिमेला अडथळा निर्माण होत होता. अखेर दि. (9) रविवारी रोजी 1 ते 2 किलोमीटर अंतरावर शोध मोहिमेला यश आले. वाहुन गेलेल्या त्या तीनही बालकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले मृत्यूदेह बघताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. या दुदैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
या शोध मोहिमेत गोंडपीपरी चे तहसीलदार शुभम बहाकर कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड, लाठीचे ठाणेदार शहारे, विरुर चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल, आणि गोंडपीपरी ठाणेदार जीवन राजगुरु हे तळ ठोकून होते. दरम्यान आज घटनास्थळी आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी स्नेहल राहटे, तहसीलदार शुभम बहाकर, संवर्ग विकास अधिकारी शालीक माऊलीकर, शिक्षणाधिकारी हिवरकर, पोलीस अधिकारी, तलाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी भेट दिली .
तसेच मृतक बालकाचे घरी जाऊन पालकांचे सांत्वन केले यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार सुभाष धोटे यांनी दिली.