Chandrapur 🎯महिलेला वाघाने केले ठार

 







चंद्रपूर/तळोधी, अमृत कुचनकर : तळोधी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या आकापूरच्या शेत शिवारात महिलेला वाघाने ठार केल्याची घटना दि 12 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताचे सुमारास आकापूर येथील शेतशिवारात घडली. हा प्रकार रात्री 8.30 च्या सुमारास उघडकीस आला.

मानसिक तणावातून चंद्रपुरात डॉक्टरने केली आत्महत्या


सौ दुर्गा जीवन चनफने (47 वर्ष) ही महिला शेतात काम करण्यासाठी गेली. उशीर झाल्यावरही ती परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला असता तिचे शीर नसलेले शव आढळून आले. दबा धरुन बसलेल्या वाघाने दुर्गा जीवन चनफने या महिलेवर हल्ला केला व ठार केले. अशी चर्चा आता सुरु आहे.


ग्रामपंचायत आकापूर ने दि 6-3-2023 रोजी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी इथे पत्र दिले होते परंतु वनविभागाने ग्रामपंचायत च्या पत्राकडे दुर्लक्ष केले व वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीही उपाय योजना केली नाही, असा आरोप आकापूर येथील नागरिक करीत आहेत.


महिलेचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे नेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. घटनास्थळी वन अधिकारी दाखल झाले. उशिरा रात्री पर्यंत लोकांनी एकच गर्दी केली.

Post a Comment

Previous Post Next Post