अवैध दारू बंद करा; कैकाडीगुडा ग्रामस्थांची राजुराच्या ठाणेदारांकडे मागणी.

 





चंद्रपूर, अमृत कुचनकर :- राजुरा तालुक्यातील मौजा पाचगाव अंतर्गत येणाऱ्या कैकाडीगुडा येथे अनेक दिवसांपासून बेगुमानपणे अवैध दारू सुरू आहे. येथील अवैध दारू बंद करा Ban illegal liquor अशी मागणी स्थानिक नागरिक, महिला यांनी Rajura Police Station राजुराचे पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रसंगी ठाणेदार नागरगोजे यांनी महिलांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने येथील अवैध दारू बंद करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या प्रसंगी पाचगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आत्माचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, तारा बुमावार, उमादेवी मेकलवार, विनिता शमनवार, ईश्वराबाई तद्दलवार, सुषमा कोटावार, शैफिना तोडेटीवार, अंगाका रामवार, रेखा तोडेट्टीवार, मल्लुबाई तोडेट्टीवार, पार्वताबाई गपकवार, सुनीता गपकवार, गायका सिप्पावार, सुलोचना राजनवार, पदमा देशभतवार, शैलजा राजनवार,

क्रिष्णा तोडेट्टीवार, प्रजेशवरी तोडेट्टीवार, लक्ष्मी तोडेट्टीवार, सिद्धेश्वरी तोडेट्टीवार सत्थुबाई तोडेट्टीवार, मनिषा पुत्रवार, शंकर उपगनलावार, श्रीनिवास शपवार, संतोष तोडेट्टीवार यासह स्थानिक नागरिक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post