स्व वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त गावागावात मोहीम

 *चिमूर तालुक्यातील कृषी संजीवनी सप्ताह मोहीम संपन्न*




                  



चंद्रपूर / चिमूर, सुनिल कोसे : चिमूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिमूर मार्फत स्व वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि 25 जून ते 1 जुलै या कालावधीत गावागावात कृषी संजीवनी मोहीम साजरी करणयात आली या मोहिमेत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

                     संपुर्ण महाराष्ट्र राज्यात 25 जून ते1 जुलै या कालावधीत स्व वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी कृषि संजीवणी मोहीम म्हणून राबविण्यात येते याप्रमाणे चिमूर तालुक्यात अनेक गावांत राबविण्यात आली दि 25 जूनला सुरवात करण्यात आली. यात कृषि पीक तंत्रज्ञान प्रसार दिन ,पौष्टीक आहार प्रसार ,कृषी महिला शेतकरी सन्मान दिन ,जमीन सुपीकता जागृती दिन , कृषी क्षेत्राची भावी दिशा ,कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन आदी कार्यक्रमा सहित 1 जुलैला कृषी दिन कार्यक्रम तालुक्यातील बोथली येथे तालुका कृषी विभाग व पंचायत समिती चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

                या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सहारे मॅडम कृषी अधिकारी प स मोरेश्वर झाडे हेमंत सेनद्रे कृषी भूषण शेतकरी, डी ए तिखे तालुका कृषी अधिकारी चिमूर प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते यात तालुका कृषी अधिकारी तिखे यांच्या मार्गदर्शनात खरीप हंगाम यशस्वी व्हावा.

      यासाठी कृषी च्या विविध योजना आधुनिक शेती तंत्रज्ञान यांची माहिती शेतकरी बांधवाना देण्यात आली तसेच मान्यवरांनी सुद्धा कृषी विषयक पिकांची तंत्रज्ञान विविध योजना यांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन कांबळे कृषी अधिकारी प स प्रस्ताविक राठोड कृषि अधिकारी प स चिमूर तर आभार कुळसगे यांनी मानले..


#तालुका कृषी अधिकारी #चंद्रपूर #महाराष्ट्र #बातमी #गावाकडचीबातमी #विदर्भ 

Post a Comment

Previous Post Next Post