मूर्तिजापूर - तालुक्यातील माना पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले सुरज संभाजी सुरोशे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नव्यानेच रुजू झालेले व नागपूर शहर मधून आलेले सुरज संभाजी सुरोशे हे माना येथे कर्तव्यदक्ष ठाणेदार म्हणून दिनांक 30 जून रोजी माना येथे पोलीस निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार झाली असून या अगोदर माना पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले कैलास भगत हे स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथे त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर सुरज संभाजी सुरोशे यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या या नियुक्तीने माना वासियात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावातील कायदा व सुव्यवस्था यावर नवीनच आलेले ठाणेदार सुरज सुरवसे यांचा वचक असावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
Tags : #अकोला #Maharashtra #akolanews #Gavakadachibatmi #police