मूर्तिजापूर - गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात अंगणवाडी मदतनीस यांच्या जागा रिक्त असून ह्या जागा न भरल्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी बालकांचे भविष्य धोक्यात आले होते परंतु नुकताच शासनाने तालुक्यातील ३५ मदतनीस पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना मूर्तिजापूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता तालुक्यात एकुण ३५ जागा रिक्त होत्या यांमध्ये सोनोरी ( मूर्ति.) धानोरा वैद्य ,कानडी कवळा जहागीर शेलू वेताळ , सोनाळा, राजुरा सरोदे, बीडगाव , बोरगाव निगोंट, जामठी बु, राजापूर खिनखीनी, नागोली, भटोरी, गोरेगाव, मंगरूळ कांबे,पारद, सांगवी, टीपटाळा, कादवी, कुरुम, माना, सोनारी बपोरी, दापुरा, हिरपुर, जीतापूर,दताळा,नवसाळ या गावांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी दि ३जुलै पासून ते १४जुलै२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत गावातील पात्र महिलांनी जास्तीत जास्त अर्ज करावे असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी मूर्तिजापूर यांनी केले आहे.
#मूर्तिजापूर #अंगणवाडी #मदतनीस #गावाकडची बातमी