मूर्तिजापूरच्या शहर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार सचिन यादव यांना निरोप तर नवनियुक्त ठाणेदार भाऊराव घुगे यांचे स्वागत

 








मूर्तिजापूर - शहर पोलीस स्टेशन येथून स्थानांतरीत झालेले पोलीस निरीक्षक सचिन यादव यांना निरोप तर नवनियुक्त पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांचा सत्कार करण्यात आला.        कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनियुक्त पोलीस निरीक्षक घुगे तर सत्कारमूर्ती पोलीस निरीक्षक सचिन यादव, प्रमुख अतिथी शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष विनायक गुल्हाने ,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ॴकाराम भोरखडे समाजसेविका झिंगूबाई बोलके ,कवयित्री सुनीता इंगळे, पोलीस निरीक्षक मनोहर वानखडे इत्यादी उपस्थित होते.

मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या कार्यकाळात झाला तोच धागा नवनियुक्त पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे हे कायम ठेवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





 वर्दीवर असतांना आपण सामान्य माणसाचा विचार करून नोकरी केली पाहिजे उद्या माझ्या कुटुंबातील एखाद्या पोलिसांनी वाईट वागणूक दिली तर सर्व पोलीस वाईट असतात असा समज निर्माण होईल त्यासाठी मी सर्वसामान्य ,महिला यांना समानतेची त्यांना समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी सर्वाधिक कार्यकाळ मूर्तिजापूर येथे मिळाला माझं रेकॉर्ड  पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे तोडतील असा विश्वास सत्काराला उत्तर देताना सचिन यादव यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखडे यांनी केले. नगरसेवक विनायक गुल्हाने आकाराम भोरखडे,झिंगुबाई बोलके यांनी आपले विचार व्यक्त केले. पोलीस स्टेशन सामान्यांना आपलं वाटावं यासाठी स्पर्धा परीक्षेचे‌ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र पोलीस स्टेशन आवारात निर्माण व्हावे अशी मागणी समाधान इंगळे यांनी यावेळी केली.





समाजात जे जे चांगलं करता येईल ते ते पोलीस स्टेशनमध्ये करण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेईल व महिला भगिनी यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्तुत्वातून दाखवून देईल असा विश्वास नवनियुक्त पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी व्यक्त केला . पोलीस कर्मचारी, भारती बौद्ध महासभा व शहरातील इतर संघटनांच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन यादव व भावराव घुगे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे तर आभार रामेश्वर धंदर यांनी मानले. भारतीय बाैद्ध महासभेचे पदाधिकारी प्रा.गाेवर्धन इंगाेले,सुरेश इंगऴे,दिनेश आटाेटे,अशाेक इंगळे,विजय वानखडे,महिला संघ इ उपस्थित हाेते.


#गावाकडचीबातमी #महाराष्ट्र पोलीस #अकोला 

Post a Comment

Previous Post Next Post