अवैधरित्या देशी दारूची वाहतूक, एकाला अटक.

 



विशेष प्रतिनिधी अमृत कुचनकर 


Police station Padoli : चंद्रपूर मार्गावरील MIDC ते चिंचाळा मार्गे एक व्यक्ती कार मधून अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करून पडोली पोलीस स्टेशन हद्दीत विक्रीसाठी आणत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पडली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिलसिंग पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच चिंचाळा येथे नाकाबंदी करण्यात आली. 

दरम्यान समोरून येणाऱ्या एका कारला थांबवून पाहणी केली असता 21 बॉक्स मध्ये संत्रा कंपनी, 90 ML, 2100 देशी दारूच्या बॉटला मिळुन आल्या. पोलिसांनी देशी दारू किंमत 1 लाख, 5 हजार, एक SANTRO कार क्रमांक MH34-AA-2447 किंमत 2 लाख, एक मोबाईल किंमत 10 हजार, असा एकुण 3 लाख, 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करून सुंदरसिंग रा. महाकाली नगर घुग्गुस, या आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनिलसिंग पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकिरण मडावी, पोउपनि अभिषेक जनगमवार, पोलीस अंमलदार प्रतीक, धीरज भोयर यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post