गुरुपौर्णिमा उत्सव चे भव्य आयोजन







श्री रुक्मिणी विदर्भ पिठाचे पिठाधीश अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य समर्थ माऊली सरकार यांच्या प्रमुख उपस्थिती


प्रतिनिधी, शशांक चौधरी -


  रुक्मिणी विदर्भ पीठ कौंडण्यपूर

 यांच्यावतीने दिनांक २ व ३ जुलै २०२३ ला गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होतो आहे. श्री रुक्मिणी विदर्भ पिठाचे पिठाधीश अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य समर्थ माऊली सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गुरु पौर्णिमा उत्सव संपन्न होतआहे. मानवी जीवनात गुरुचे स्थान अनन्यसाधारण आहे. स्वामीजी हे महागुरू आहेत .तसेच ते महान शिष्य आहेत. पूजनीय सीताराम बाबा हे त्यांचे गुरु आहेत .दीर्घकाळपर्यंत त्यांनी गुरुसेवा व गुरुभक्ती केली आहे .आज स्वामीजी हजारो भक्तांचे गुरु आहेत म्हणूनच त्यांचा उल्लेख महागुरू असा केला जातो. हजारोंचे ते मार्गदर्शक व आधारवड आहेत. जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील विविध ठिकाणांवरून भक्तगण या गुरु पौर्णिमा उत्सवासाठी येतात. मोठ्या प्रमाणात दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. स्वामी जी भारतीय आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व आहे .

१७ जानेवारी २०१३ ला भारतातील विविध आखाड्यांच्या महंतांनी तीस वर्षीय स्वामीजींची जगद्गुरु रामानंदचार्य पदी अविरोध निवड केली. ही घटना ऐतिहासिक व भूतपूर्व होती. एवढ्या कमी वयात बहुजन समाजातील स्वामी यापूर्वी या पदावर नियुक्त झाले नव्हते. स्वामीजींना पट्ट्याभिषेक करून त्यांची प्रयाग कुंभमेळ्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हा क्षण मराठी माणसांसाठी अत्यंत अभिमानाचा होता.

Post a Comment

Previous Post Next Post