नेरी ग्रामपंचायतीने सर्वच वाहनांना एकच नियम लागू करून समान न्याय द्यावा बाजारचौकातील मालवाहक चारचाकी वाहनधारकांची मागणी

 


              

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुनिल कोसे 



चंद्रपूर/ चिमूर :   चिमूर तालुक्यातील नेरी येथील बाजार चौकात माल वाहक चारचाकी वाहने उभी राहतात त्यामुळे व्यापारी वर्गाला तसेच रहदारीचा अडचण निर्माण होते. त्यामुळे ग्रा प नी पार्किंग ची व्यवस्था या वाहनांना करून देण्यात यावी असा व्यापारी वर्गाचा सूर होता परंतु मागील चाळीस वर्षांपासून मालवाहक वाहने शिस्तीत खुल्या जागेत उभी राहतात.

    त्यांचा कुठलाही त्रास नसून अन्य वाहने रिकाम्या जागेत उभी असतात भाजीपाल्याच्या गाड्या उभ्या असतात गॅरेज मालवाहक गाड्या रस्त्यावर येतात प्रत्येक दुकानात माल पोहचता करतात तसेच बस सुद्धा आतमध्ये येणे जाणे सुरूच असते.

      या सर्वांचा सुद्धा नेहमीचाच त्रास आहे तेव्हा सर्व वाहनांना एकच नियम लागू करून समान न्याय द्यावा सर्वांना बाहेर जागा उपलब्ध करून द्यावी, बसेस साठी सुद्धा बस स्टँड बाहेर बांधावे जड वाहतूक चौकातून थांबवावी चारचाकी दुचाकी ला सुद्धा बाहेर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मालवाहक चारचाकी वाहनधारकांनी केली आहे.

                  सविस्तर असे की नेरी येथील बाजार चौकात खुली जागा आहे त्यातील काही जागेवर मालवाहक गाड्या ग्राहकांच्या माल ने आन करण्यासाठी उभ्या असतात यावरच त्यांचा पोट उभा आहे.  मागील अनेक वर्षांपासून याच ठिकाणी गाड्या उभ्या करून व्यवसाय करीत आहेत.

    परंतु काही उपद्रवी व्यापारी वर्गाकडून हेतुपुरस्सर वाहने हटवा अशी मागणी केली आहे परंतु सदर वाहनाने कुठलाही त्रास नसून मागील चाळीस वर्षांपासून मालवाहक गाड्या उभ्या असतात व व्यवसाय करीत आहेत. सर्व काही व्यवस्थित आहे पण काही व्यापारी वर्ग याला विरोध करीत आहे.

     तेव्हा या मालवाहक गाड्या यांना नको असेल तर सर्वावर सारखी कारवाई करण्यात यावी यात बस बाजार चौकात येणे थांबवावे , गॅरेज चे ट्रक बाहेर थांबवून व्यापारी वर्गाने आपला माल आणावा, रस्त्यावर आलेल्या दुकानावर कारवाई करावी जड वाहतूक या चौकातून बंद करावी,दुचाकी अन्य वाहनांना सुद्धा बाहेर थांबवावे त्यांची सुद्धा व्यवस्था करावी भाजीपाला विक्रेत्यांना रस्त्यावर बसू देऊ नये त्यांच्या गाड्या बाहेर ठेवाव्या त्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही आणि व्यापारी वर्गाला व्यवसाय करायला चांगले होईल यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही.

       तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वांना समान न्याय देऊन सर्वांची व्यवस्था करून द्यावी एकट्या मालवाहक गरीब व्यवसायिकांच्या पोटावर पाणी फेरू नये अशी आर्त हाक देत सर्वांना एकच नियम लागू करावा अशी मागणी प्रस्तुत प्रतिनिधी सी बोलताना मालवाहक चारचाकी वाहनधारकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post